17 मे रोजी अहिल्यानगर येथे जायंटसच्या द्वितीय कौन्सिल मीटिंग व सहेली सिंपोझीयमचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जायंटस वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन दोन ब ची द्वितीय कौन्सिल मीटिंग व सहेली सिम्पोझियम चे आयोजन दिनांक 17 मे रोजी अहिल्यानगर स्थित हॉटेल यश पॅलेस येथे करण्यात आले आहे यासाठी फेडरेशन कौन्सिलच्या सर्व पदाधिकारी व सहेली सिम्पोझियम साठी सर्व महिला प्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन फेडरेशन दोन ब चे अध्यक्ष जुगलकिशोर हरकुट व सचिव सन्मती जैन यांनी केले आहे.त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्तं पत्रकात नमूद केले आहे की जायंटस वेल्फेअर फाउंडेशन ही एक समाजसेवी संस्था असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. नाना चुडासामा यांनी 1973 मध्ये मुंबई येथे या संस्थेची भारतीय संस्था म्हणून स्थापना केल्यानंतर परदेशात या संस्थेने आपल्या शाखा सुरू केल्या भारतात 600 शाखेद्वारे विवीध राज्यात काम सुरू असून 25 हजाराचे वर सदस्य यामध्ये सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक ,वैद्यकीय, अवयव दान, अशा क्षेत्रात काम करीत आहे.फेडरेशन 2 ब मधील पदाधिकाऱ्यांची द्वितीय कौन्सिल मीटिंग व सहेली सिंपोझियम मीटिंग चे आयोजन जायंटस ग्रुप ऑफ अहिल्यानगर च्या वतीने हॉटेल यश पॅलेस मध्ये दिनांक 17 मे 26 रोजी करण्यात आलेले आहे या द्वितीय कौन्सिल मीटिंगसाठी फेडरेशन दोन ब मधील सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच सहेली सिंपोझियम साठी फेडरेशन दोन ब मधील सर्व महिला सदस्यांनी उपस्थित राहण्याचे संयुक्त आवाहन फेडरेशन अध्यक्ष जुगलकिशोर हरकुट व सचिव सन्मती जैन यांनी केले आहे.


