ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोदीजींच्या योजना घरोघरी पोहचवा – माजी आमदार गिरिषजी व्यास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतिने भाजपाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी,बुथ प्रमुख,शक्तिकेंद्र प्रमुख व कार्यकर्ते यांची बैठक कृषी उत्पन्न बाजार समीती येथे नुकतीच संपन्न झाली.

बैठकीसाठी प्रदेशाकडुन आलेले माजी आमदार गिरीशजी व्यास हे अध्यक्षस्थानी होते,तर प्रमुख उपस्थिती ब्रन्हपुरी भाजपाचे पालक्त्व माजी आमदार अतुलभाऊ देशकर,प्रा.कादर शेख गिरीशजी व्यास बोलतांना सांगितले की,मोदी साहेबांच्या नेतृत्वात प्रत्येक घरी गॅस,विज,शौचालय अश्या योजनांचा लाभ गोरगरीबांना मिळवुन दिला.

त्यातच शेतकर्‍यांसाठी शेतीसाठी उपयोगी सिंचनाची सोय,खते,बी-बियाणे अश्या शेतीसाठी लागणार्‍या घटकांची सोय करुन दिली..
पिएम किसान,आयुष्यमान भारत,विश्वकर्मा योजना,वंचित घटकांसाठी शैक्षणिक सोयी-सुविधा अश्या अनेकानेक योजना मा.मोदी साहेबांनी राबविल्यात मोदी साहेबांच्या सर्व योजनांची माहीती गोरगरीब,कष्टकरी,सर्वसामान्य माणसाला पटवुन सांगा
राज्य सरकारनी मोदी कृषी किसान योजना,५ लाखापर्यंत मोफत उपचार,शिष्यवृत्ती,ओबीसींसाठी वस्तीगृह,दिन दलीत,गोर-गरिब मुलांसाठी परदेशी शिक्षणासाठी उत्तम सोय,गोरगरिब लोकांना आनंदाचा शिधा अश्या योजना प्रत्येक व्यक्तींजवळ पोहचवा.

येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत आपल्याला जिद्द आणि चिकाटीने मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी कामाला लागा. प्रत्येक बुथवर आपल्या माणसाला मोदी साहेबांनी केलेल्या कार्याची माहीती द्या,विरोधक बलाढ्य असेल तरी खचु नका विजय आपलाच आहे ह्या भावनेने काम करा,दिवसातुन १ तास पक्षासाठी सर्मपण करा या प्रसंगी अविनाश पाल तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा चंद्रपुर,संतोष भाऊ तंगडपल्लीवार माजी जि.प.बांधकाम सभापती, तुकाराम पा.ठिकरे माजी प.सं.सदस्य,आशिष कार्लेकर शहराध्यक्ष,किशोरभाऊ वाकुडकर,अर्जुन भोयर,अरुण पाल,निलमताई सुरमवार नगरसेवक,शेरकी ताई,प्रतिभाताई बोबाटे,शोभाताई बाबनवाडे,गुरनुले ताई,गुड्डीताई सहारे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये