ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांगापूर लगतच्या पेट्रोल पंपाच्या बाजूच्या पानठेल्यावर अवैध दारू विक्री जोमात!

 तर पोलीस प्रशासन कोमात!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा(जि.प्र.) जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वडणेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गांगापूर गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपा जवळ एक चहा ची टपरी आहे तिथे चहा विकता विकता आता अवैधरित्या दारूची विक्रीच मोठ्याप्रमाणात सुरू झाली आहे. त्या मुळे जवळ पासचे नागरिक युवा इथे दारू पिण्यास येत आहे त्यामुळे येथे नेहमी वादविवाद होत असून कदाचित एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घालून हा अवैध दारु विक्री व्यवसाय बंद करावा असा प्रकार काही दिवसापूर्वी गांगापूर गावाजवळ बस स्टॉपजवळच्या पानठेल्यावर अवैध दारू विक्री होत होती.

मात्र गंगापूर येथील महिलांनी आक्रमक भूमिका घेऊन तो पानठेला हटविला होता मात्र आता पुन्हा एकदा पेट्रोल पंपाजवळच्या चहा टपरीवर अवैध दारु विक्री सुरू झाल्याने अनेक तरुणांचे दारू मुळे परिवांर उध्वस्त झाले त्यामुळे वडनेर पोलिसांनी झोतून जागे होऊन ही अवैधपणे होणारी दारु विक्री बंध करण्यात यावी आणि अवैध दारु विक्रेत्यावर कडक कायदेशीर कारवाई करत चांगला पोलीसी खाक्या दाखवून कारवाई करण्यात यावी अशी परिसरातील जनतेची मागणी आहे मात्र वडनेर पोलीस या अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई करणार का असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये पडला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये