महिलांनी प्रगतीसाठी विविध स्पर्धेत सहभाग घ्यावा – प्रा. विजय आकनुरवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
महिलांनी आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक कार्यासोबतच त्यांनी आपल्या प्रगतीसाठी विविध स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी केले.
ते गडचांदूर येथील विद्यानगरी मध्ये संनराईज योगा ग्रुप तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा विजय आकनुरवार होते तर यावेळी उद्घाटीका म्हणून मुख्याध्यापिका सौ मंगला धुर्वे होत्या यावेळी त्यानी सुद्धा महिलांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले पर्यावरण विषयावर चित्रकला स्पर्धा संनराईज ग्रुप तर्फे आयोजित केली होती.
या स्पर्धेत 44 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रदुषण मुक्त करण्यासाठी आणि उत्तम पर्यावरण राहण्यासाठी महिलांनी सुंदर चित्र रेखाटले या कार्यक्रमाच्या संयोजिका कुंतल चव्हाण यांनी प्रास्ताविक भाषणं केले संचालन लता बोबडे यांनी तर आभार प्रदर्शन सौ छाया बुरान यांनी केले कार्यक्रमाला मोठया संख्येनी महिला उपस्थित होत्या.