ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर संरक्षण दल(NSD)चा पाचवा वर्धापन दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर-मागील पाच वर्षां पासून बल्लारपूर नगर परिषद अंतर्गत नगर संरक्षण दल ची स्थापना करण्यात आली, बल्लारपूर डिझास्टर रिस्कु फोर्स या नावाने NSD कार्य करीत आहे पूर्व मुख्याधिकारी विपीन मूद्धा तहसीलदार विकास अहीर व ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांचा मार्गदर्शन प्रेरणेने NSD ची स्थापना करण्यात आली.

आपत्ती ग्रस्त वेळेस आपत्तीत अडकलेल्या व्यक्तीला बचाव करण्यासाठी मदद करणे महापूर आलेल्या ठिकाणी पुरा मध्ये अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढून जीव वाचविणे, भीषण आग लागलेल्या ठिकाणी अग्निशमन दलास व पोलिस विभागाला मदद करणे सार्वजनिक कार्यक्रमात जमा झालेल्या गर्दीला नियंत्रित करणे अपघात झालेल्या ठिकाणी अपघात ग्रस्त वाहनात अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढून रुग्णालयात दाखल करणे, गणपती, देवी विसर्जनात गर्दीला नियंत्रित करून विसर्जन घाटावर पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे असे उद्देश घेऊन मागील पाच वर्षे पासून नगर संरक्षण दल कार्यरत आहे.

आत्तापर्यंत अनेक आपत्ती ग्रस्त व्यक्तीला मदत करण्यात आली,कोरोना काळात अनेक कुटुंबाला अन्न पुरवठा करण्यात आला, वृक्ष रोपणात 1000 झाडे लावण्यात आले,या दला मध्ये तैराकी दहा सर्पमित्र सहा, आखाडा खेळाडू पंधरा, सदस्य सोबत चाळीस जवानांचे पथक आहे.

दि,12/10/2023 ला पाचवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला त्या वेळेस मुख्य अतिंथी भाजप शहर अध्यक्ष मा, काशी सिंग, पर्यावरण वाहिनीचे मा, शरीफ सर, वनरक्षक बोकडे साहेब,सामाजिक कार्यकर्ता प्रकाश दोतपेलली, संजय डुंबेरे,ज्ञानेद्र आर्य,पत्रकार मुन्ना खेडकर,घनश्याम बुरडकर,वसंत मुन,धनंजय पांढरे,भावना डुंबेरे उपस्थित होते.

पाच किलो चा केक कापून वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले,या दलाचे संस्थापक रंगय्या आद्दूरवार,विशाल डुंबेरे,सोबतच मंगेश नंदगीरवार,राकेश लांबोडे,भास्कर पेंदोर, सतीश देवईकर,सुरज श्रीवास, दीपक यादव,मेहमूद खान पठाण,प्रवीण दासरफ, शुभम अनुवर्ती, जजबिर सिंग बैस, नरेश दोडापाका, ऋषिकेश आद्दूरवार इतर टीमचा समावेश होता.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये