ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तंबाखू नियंत्रणासाठी बल्लारपूर तालुक्यात समितीची स्थापना

ना. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशावरून तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. गणेश टोंगे

बल्लारपूर : संपूर्ण महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू तसेच खर्रा विक्री व गुटका विक्रीवर बंदी असली तरी बल्लारपूर तालुका सह शहरात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री सरास केल्या जाते. बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री होत असून, त्यामुळे बल्लारपूर तालुका सह शहरातील तरुण लहान वयातच घातक व्यसनाच्या आहारी गेल्याचे विदारक चित्र समोर आल्यामुळे मा ना सुधिर मुनगंटीवाांच्या माध्यमातून अमली पदार्थाच्या आहारी जात असलेल्या तरुणांना या विळख्यातून काडून. कॅन्सर सारख्या आजारा पासून बचाव करता यावी याची दखल घेत श्रेत्राचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण बल्लारपूर तालुक्याला तंबाखूपासून मुक्त करण्याचे उद्देशाने तंबाखू नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली.

या समिति मध्ये अध्यक्ष तहसीलदार कांचन जगताप,सचिव तालुका आरोग्य अधिकारी सुधीर मेश्राम, सदस्य गट विकास अधिकारी अनिरुद्ध वाळके, पोलीस निरीक्षक उमेश पाटील,वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय डॉ.विजय वडस्कर, आरोग्य व तंबाखू नियंत्रण या क्षेत्रात काम करणारी संस्थेचे श्रवण सातपुते व सामाजिक कार्यकरता विकास दुपारे या सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये