क्राईम न्युजमहाराष्ट्र

जिल्हा पोलीसांची दारुबंदी कायदयान्वये वॉश आऊट मोहीम कारवाई

एकुन ५१ आरोपीतावर गुन्हे नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन साहेब, वर्धा यांचे निर्देशानुसार दिनांक ०५.०६.२०२३ ते ०७.०६.२३ रोजी वर्धा जिल्हयातील १९ पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये वॉश आऊट मोहिम राबवुन जिल्हयात अवैधरित्या दारु विक्री तसेच वाहतुक करणा-यांवर स्थानीक गुन्हे शाखा वर्धा व पालीस स्टेशन मार्फतीने एकुन ५१ केसेस करुन १,११२,३२०/- रु.चा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन एकुन ५१ आरोपीतावर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे.

तसेच मा. पोलीस अधिक्षक साहेब जिल्हा वर्धा यांच्या आदेशाने जिल्हयातील प्रत्येक पोलीस स्टेशन हददीतील दारू विक्रेते यांना सायंकाळी ०६.०० वा ते रात्री १०.०० वा. पर्यंत पोलीस स्टेशन ला बोलाऊन बसवुन ठेवण्यात येत आहे तसेच पोलीस स्टेशन मधील ठाणेदार दारू विक्रेत्यांना दारू विक्री न करण्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये