ताज्या घडामोडी

रानडुक्कराचे मांस विक्री करणाऱ्या 7 आरोपींना अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

प्रशांत रणदिवे, बल्लारपूर

दिनांक 07 मे 2024 ला अवैधरित्या रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार करुन मास विक्री करीता वाहतुक करीत असल्याची गुप्त माहिती नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना प्राप्त झाली. माहितीचे आधारे बल्हारपुर शहरातील सास्ती पुलीया परिसरात सापळा रचुन आरोपी श्रीकृष्ण गुलाब पवार, रा. हिरापुर, सदाशिव भास्कर देवगडे, रा. हिरापुर, वसंता यादव तोडेकर, रा. बल्हारपुर व तोमरय्या राजेय्या धोबल्ला, रा. बल्हारपुर यांना रानडुक्कराचे 10 कि.ग्रा. मांसासाह ताब्यात घेतले.

वरील आरोपींची अधिक चौकशी केली असता ते रानडुक्कर वन्यप्राण्याचे मांस विक्री करीत आणल्याची त्यांनी कबुली दिली. त्यांनतर मांस विकत घेणारे आरोपी सुनील सदाशिव तुमराम, रा. महात्मा गांधी वार्ड बल्हारपुर, सावण सोजन बरसे, रा. गोकुलनगर वार्ड बल्हारपुर व जाणी पोचम गाजुल्ला, सुभाष नगर वार्ड बल्हारपुर यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी आरोपी वसंता यादव तोडेकर, रा. बल्हारपुर यांचे कडुन वन्यप्राण्याचे मांस विकत घेत असल्याबाबत सांगितले असता वरील सर्व आरोपी 1 ते 7 विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2, 9, 39, 44, 51 व 52 अन्वये प्राथमिक वनगुन्हा क्रमांक 08962/224045 दिनांक 07.05.2024 अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला असुन वनगुन्हात वापरण्यात आलेले 2 मोटार सायकल, इतर साहित्य व रोख रक्कम 16,810.00 जप्त करुन जप्तीनामा नोंदविण्यात आला. या कार्यवाही मुळे वन्यप्राण्याची शिकार करुन मांस विक्री करणाऱ्या टोळीचा मोठा रॅकेट उघडकीस आला.

सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे करीत आहेत.

सदर कार्यवाही दरम्यान क्षेत्र सहाय्यक ए.एस. पठाण, के.एन. घुगलोत, बी.टी.पुरी, वनरक्षक सुधीर बोकडे, तानाजी कामले, परमेश्वर आनकाडे, सुनिल नन्नावरे, धमेन्द्र मेधाम, एस.आर. देशमुख, ए.बी. चौधरी, एस.एस. नैताम यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये