Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

आय टी आय अप्रेंटीस विद्यार्थी 1500रूपये मानधनच्या प्रतीक्षेत 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आय टी आय झाल्यानंतर अप्रेंटिस शिप करित असलेल्या विद्यार्थ्याना महाराष्ट्र सरकारने दर महिन्याला 1500 रूपये मानधन देण्यात येईल अशी घोषणा केली मात्र 4 महिने झाले तरी पात्र विद्यार्थ्याच्या बँक खात्यात डी बी टी प्रणाली द्वारे 1500 रूपये जमा केले नाही. त्यामूळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

सत्तारूढ सरकारने निवडणुकीत स्वतःच्या विजयासाठी स्वार्थासाठी लाडक्या बहिणीला 1500 रूपये दिले मात्र शिक्षण घेत असलेल्या गोर गरीब विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून घोर फसवणूक केली आहे असा आरोप केला जातो आहे.

तरी शासनाचे तात्काळ घोषित केल्यानुसार अप्रेंटीस धारक विद्यार्थ्यांचे मानधन 1500रूपये बँक खात्यात जमा करावे अशी मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये