ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गजानन भिकाजी गेडाम यांना समाज भुषण पुरस्कार प्राप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

नगर भवन कार्यालय, बाजार चौक वरोरा येथे सुशीला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा व सुशीला काव्य विचार साहित्य मंच आयोजित पाहिले राज्य स्तरीय काव्य संमेलन तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सदर सोहळ्यात एकूण १२ पुरस्कार प्रदान करण्यात आले असून यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील अधीपरीचारिका पुरुष पदावर कार्यरत गजानन भिकाजी गेडाम यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

गजानन गेडाम यांनी आतापर्यंत २८ वेळा रक्तदान, संपूर्ण अवयव दानाचा संकल्प, कोरोना काळात कोरोना योध्दा तसेच आरोग्यसेवा लोकांपर्यंत पोहोचविने आदी उल्लेखनीय कामे केलेली आहेत.गजानन गेडाम यांना सन्मानित केल्याबद्दल संपूर्ण गडचिरोली जिल्हयामध्ये शुभेच्छाच्या वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये