ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलच्या प्रांगणावर संयुक्तपणे करण्यात आले दांडीया नृत्य

माजी आमदारांच्या प्रयत्नाने युवती व महिलांना उपलब्ध करून देण्यात आले व्यासपीठ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीतील युवती व महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर प्रतिष्ठान चे वतीने नवरात्रोत्सवात दिनांक एक ऑक्टोबर 24 ते 5 ऑक्टोबर 24 या पाच दिवसात जवळपास पंधराशे युवती व महिलांना तंत्रशुद्ध पद्धतीने गरबा दांडिया रास चे प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये वय 5 ते 80 पर्यंतच्या युवती व महिलानी सहभाग नोंदविला होता तर या सर्व प्रशिक्षण घेतलेल्या युवती व महिलांसाठी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलच्या प्रांगणात सामूहिक रित्या गरबा दांडिया रास नृत्याचे फार मोठ्या प्रमाणात संगीतमय वातावरणात आयोजन करण्यात आले बऱ्याच वर्षापासून महिलांना रोजच्या चूल मूल संसार व्यवसाय यापेक्षा वेगळे काहीतरी देण्याची इच्छा या प्रतिष्ठानची होती या शहरात महिलांचे विविध मंडळ असून या मंडळाच्या माध्यमातून महिलांचा स्तर उंचवावा त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना वेळोवेळी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या महिला मंडळाचे वतीने करण्यात आलेले आहे.

हीच बाब हेरून डॉक्टर भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर यांनी नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील या महिला मंडळाचे प्रतीक्षा देव उपाध्ये आदिशक्ती ग्रुपच्या रूपाली डोणगावकर पल्लवी वाजपे ज्योतीताई दीडहाते,माधुरी सपाटे,किरण सपाटे,नेहा सूनगत, मनीषा सचिन व्यास, राधिका सागर व्यास, कोरिओग्राफर प्रिया संत यांच्यासोबत संपर्क करून बुलढाणा येथील कोरिओग्राफर अमोल जाधव यांचे सहकार्याने दिनांक एक ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर या पाच दिवसाचे तंत्रशुद्ध पद्धतीने गरबा रास दांडियाचे मोफत प्रशिक्षण दिले व दिनांक 6 ऑक्टोबर रोजी भव्य असे ज्यांनी ज्यांनी प्रशिक्षण घेतले त्यांच्यासाठी दांडिया नृत्याचे संगीतमय वातावरणात आयोजन केले यामध्ये वय गट पाच ते 80 पर्यंतच्या पंधराशे युवती व महिलांचा समावेश होता यामध्ये भव्य बक्षिसांची लूट करण्यात आली समारोपाला माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, राजश्रीताई जाधव, डॉ.सौ उषाताई खेडेकर, रंजना रायमुलकर यांनी उपस्थिती दर्शवून विजयी स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले शहराच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात नवरात्री उत्सवात गरबा दांडिया रास चे आयोजन करण्यात आल्याने यामध्ये सहभागी युवती व महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून गेले होते संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहर शिवसेना पदाधिकारी शिवसेना महिला आघाडी तसेच शहर शिवसेना यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये