Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सुरक्षा सप्ताह निमीत्ताने महात्मा गांधी विद्यालय ने काढली रॅली 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय च्या वतीने सुरक्षा सप्ताह निमीत्ताने गावातून रॅली काढण्यात आली, रॅलीचा शुभारंभ मुख्याधापक साईनाथ मेश्राम,उप मुख्याध्यापक शंकरराव तुराणकर, पर्यवेक्षिका विणा देशमुख, भारती घोंगें , व शिक्षक उपस्थित होते.

शाळेतून काढण्यात आलेली रॅली बस स्थानक मार्गे पोलिस ठाण्यात आल्यानंतर विसर्जित झाली, पोलिस अधिकाऱ्यांनी विभिन्न रायफल्स बद्दल विद्यार्थ्याना माहिती दिली, पोलिस ठाण्यात चालणाऱ्या कार्याची, घडत असलेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्याची माहिती दिली, तसेच वाहतूक नियमांची माहिती दिली.

संपुर्ण पोलिस स्टेशन दाखविले, याप्रसंगी रस्ता सुरक्षा पथक प्रमुख श्रीमती भारती घोंगे, अमोल शेळके, गायत्री पिंपलकर, अमृता इखारे, तोडासे सर, आत्राम सर, कोयचाडे सर, नगराळे सर, बोलण टेकाम, गोवर्धन येलादी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये