बकरी चोरी आरोपीस अटक करून 1 लाख 55 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गुन्ह्याची हकीकत या प्रमाने आहे की, दि. 12/08/2026 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रारदार नामे श्रीकांत संजय सोरटे वय 25 वर्ष रा. चिकमोह, ता. हिंगणघाट, जि. वर्धा यांनी तक्रार दिली की, दि.11/08/2026 रोजी रात्री 12.00 वा. त्याचे मालकीच्या 11 बकऱ्या त्याचे घराचे आंगनात बांधुन घरी झोपले व दि. 12/08/2026 रोजी चे 04.00 वा. पाऊस आल्याने बकऱ्या आंगनातुन कोठ्यात बांधण्याकरीता गेले असता त्याचे घराचे आंगनात बांधुन असलेल्या अकरा बकऱ्या पैकी एक मोठी काळ्या रंगाची बकरी किं. 7000/- रू, व एक काळ्या- पांढऱ्या रंगाची पाट किं. 2000/- रू अशा दोन बकऱ्यांची दावन कापुन दि. दि.11/08/2026 रोजी रात्री 12.00 वा. ते दि. 12/08/2026 रोजी चे 04.00 वा. कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेल्या. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो. स्टे. हिंगणघाट येथे अप. क्र. 1310/2026 कलम 303 (2) बी. एन. एस. प्रमाने गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन, हिंगणघाट चे गुन्हे प्रकटीकरन पथक करत असतांना सी.सी.टी.व्ही. काँमेऱ्याचे आधारे व तांत्रीक बाबीवरून बकरी चोरी करण्यास वापरलेले वाहन निष्पन्न करून आरोपी नामे सैय्यद तौफिक सैय्यद तन्वीर, वय 36 वर्ष, रा. कलम चौक, कुरेशीपुरा, यवतमाळ यास अटक करून त्याचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती हुन्डाई कंम्पनीची सिल्वर रंगाची सेंट्रो झिंग चारचाकी वाहन क्र. एम. एच. 32 – सी. 1749 किं. 1,50,000/- रू, 2) बकरी चोरी करतांना बकऱ्याचे दावे कापण्या करीता वापरलेले कटर किं. 30/- रू, 3) चोरीच्या बकऱ्या विकुन मिळालेले पैश्या पैकी उर्वरीत नगदी 5,800/- रू असा एकुण जु. की. 1,55,830/- रू चा माल जप्त केला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधिक्षक श्री. सदाशीव वाघमारे साहेब, उप. विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशिल कुमार नायक साहेब यांचे मार्गदर्शनात व पो. नी. श्री. अनिल राऊत पो. स्टे. हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाने गुन्हे शोध पथकाचे पोहवा श्रीकांत खडसे, दिनेश तुमाने, पो. अम. प्रमोद जाधव, राजु ढगे. यांनी केली.



