ताज्या घडामोडी

राजुरा कोरपना राष्ट्रीय महामार्ग खचला – गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यासह जिल्ह्याला पावसाने झोडपले

जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित - तापमान घसरल्याने नागरिक आनंदात

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच मागील दोन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. ह्यामुळे तापमानात घट तर झाली नाहीच मात्र वातावरणातील आद्रता वाढल्याने चंद्रपूरकर हैराण झाले होते मात्र मंगळवार दिनांक 7 मे रोजी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने तापमानातील घट नागरिकांना सुखावुन गेली आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. चंद्रपूर शहरात नागरिकांना काही ठिकाणी गारांचा पाऊस अनुभवायला मिळाला तर जिल्ह्यातील बऱ्याच भागात वादळी वाऱ्याने धुळीचे ढग सुद्धा निर्माण केले होते.

पावसाच्या आगमनाने जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय घट झाली असुन तप्त लाव्ह्यावर बसलेला चंद्रपूरकरांना ही शीतलता सुखावुन जात आहे. अचानक आलेल्या पावसाने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत असुन जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला खराब होण्याची लक्षणे निर्माण होत असुन पिकांवर रोगाचे सावट देखिल निर्माण झाले असले तरीही पावसामुळे निर्माण झालेला गारवा नागरिकांसह धरणीला देखिल सुखावत आहे हे निश्चित.

राजुरा कोरपना राष्ट्रीय महामार्ग बंद

जिल्ह्यात आलेल्या दमदार पावसाने नालेही भरले असुन ह्याचा फटका राजुरा कोरपना मार्गाला बसला आहे. ह्या निर्माणाधिन राष्ट्रीय महामार्गात असलेल्या अनेक लहान मोठ्या नाल्यांवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. ह्या बांधकामामुळे अधिग्रहित जागेवर मोठमोठे खोदकाम करण्यात आले असुन पावसामुळे शेत शिवार तसेच जंगलातील पाणी ह्या नाल्यांद्वारे वाहुन जात असते मात्र होणाऱ्या बांधकामामुळे नाल्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने एका ठिकाणी पाण्याच्या जोरामुळे चक्क रस्ता खाचायाने राजुरा कोरपना मार्ग अवरुद्ध झाला असुन वाहतूक बंद झाली असल्याचेही कळले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये