स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र दिनाच्या 78व्या वर्धापन सोहळ्यानिमित्त दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी बिनबा गेटवर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या शुभप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे वतीने कार्यक्रमास उपस्थित शाळकरी विद्यार्थ्यांना नोटबुक्सचे वितरण करण्यात आले.
बिनबा वार्डातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्यास उपस्थित विद्यार्थ्यांनाही नोटबुक वितरीत करण्यात आले. या ध्वजारोहण कार्यक्रमास सर्वश्री. राजु येले, दिपचंद डोंगरे, उमाबाई खोलापूरे, रेणुकाताई घोडेस्वार, निलेश खोलापूरे, अरूण कांबळे, पंडित पायघन, चंदू जाधव, रवि डोंगरे, अजय येले, सतिश डोंगरे, गणेश पोटफोडे, सतिश बावणे, डोमा पोटफोडे, दिपक जाधव, क्रिष्णा गायकवाड, सोनु पोटफोडे, जय डोंगरे, निलेश कळणे, नितेश पडघाने, रोहण गवळी, नितेश जाधव, उमेश बावणे, वसंता पोटफोडे, नितेश आबळे, किशोर वानखेडे, लताबाई ब्राम्हणे, शितल येले, रिणा येले, शारदा गवळी, काजल उचले, सुनिता येले, शारदा डोंगरे, राणी भाम्रणे यांची उपस्थिती होती.