ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खोटे कागदपत्र तयार करून ग्राहकांना भुखंड विकून ग्राहकांची फसवणूक

आरोपींचा सावंगी पोलीसांनी शोध घेवून आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर असे की, पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी नामे श्रीमती निर्मला हरीष वासनिक रा. पुलफैल वर्धा यांनी दिलेल्या तकारीवरून आरोपी नामे 1. दिनेश महादेव सराटे 2 रश्मी मोतिराम गेडाम 3. राकेश संतोष खैरकार 4. यश संतोष खैरकार व 5. विनोद गुलाब ठाकरे यांचे विरुध्द प्लॉट विकी संदर्भात फसवणूकीची गुन्हा क. 171/2025 कलम 420,409,465,467,471,34 भादवी अन्वयेचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयात आरोपी नामे रश्मी मोतिराम गेडाम हया स्वर्गवासी झालेल्या असून ईतर आरोपींचा शोध घेवून अटक करण्यात आलेली आहे. अटकेत असताना आरोपी राकेश संतोष खैरकार व यश संतोष खैरकार यांच्या पुलगाव येथील घराची झडती घेण्यात आली. त्यामध्ये भुखंड क. 67 व 65 चे दस्ताऐवज जप्त करण्यात आले आहे. तसेच यातील पसार आरोपी विनोद गुलाब ठाकरे यास काल दि. 03/03/2025 रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आलेली आहे. तसेच आरोपी राकेश खैरकार व यश खैरकार यांचे नागपुर येथील फलॅटची तपासणी करून गुन्हया संबंधाने काही दस्तऐवज मिळते काय याबाबत तपासी अधिकारी तपास करीत आहेत.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेष्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री संदिप कापडे सा. ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि नबी शेख, पोहवा सचिन घेवंदे, व गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा सतिष दरवरे, संजय पंचभाई, अनिल वैदय, निखील फुटाणे, अमोल जाधव यांनी केलेली असून गुन्हयाचा पुढील तपास ठाणेदार संदिप कापडे पोलीस स्टेशन सावंगी मेघे हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये