Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ब्रह्मपुरीत 2983 खेळाडू दाखविणार क्रीडा कौशल्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी: अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा येथील तालुका क्रीडा संकुल मध्ये आज गुरुवार (दिनांक 19 डिसेंबर) पासून सुरू होत आहेत. 19 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूर विभागातील चिमूर चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा देवरी गडचिरोली अहेरी भामरागड या नऊ प्रकल्पातील 2983 विद्यार्थी कबड्डी, खोखो, व्हालीबॉल व हँडबॉल या सांघिक खेळांसह उंचउडी, लांबउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे व चालणे या वैयक्तिक खेळांमध्ये आपले कौशल्य दाखविणार आहेत.

विभागीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. डॉ. नामदेवराव किरसान यांच्या शुभहस्ते 19 डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर, वणी,आर्णी लोकसभा क्षेत्र तर विशेष अतिथी म्हणून मा. आ. श्री अभिजीत वंजारी, विधान परिषद सदस्य पदवीधर मतदार संघ नागपूर, मा. आ. श्री सुधाकर अडबाले, विधान परिषद सदस्य शिक्षक मतदार संघ नागपूर, मा. आ.श्री विजय वडेट्टीवार, विधानसभा सदस्य ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र, मा. आ. श्री कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया विधानसभा सदस्य चिमूर विधानसभा क्षेत्र, मा. आ. श्री करण देवताळे विधानसभा सदस्य वरोरा विधानसभा क्षेत्र उपस्थित राहणार आहेत.

20 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून उद्घाटन मा. कुमारी पर्वणी पाटील, उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांचे शुभहस्ते होत असून मा. श्री दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या अध्यक्षतेखाली, मा. सतीश मासाळ तहसीलदार ब्रह्मपुरी व मा. अर्शिया जुही, मुख्याधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये