Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील गांगलवाडी टी पॉइंट जवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

         ब्रह्मपुरी-आरमोरी ३५३ डी राष्ट्रीय महामार्गावरील गांगलवाडी टी पॉईंट जवळील सातबारा हॉटेल जवळ मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात अमोल जगन भुते (वय ३९) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतक इसम हा ब्रह्मपुरी तालुक्यातील झिलबोडी (परसोडी )गावातील रहिवासी होता.

      अमोल भुते हा स्वतः MH ४० AW ०६५९ क्रमांकाच्या दुचाकीने काही कामानिमित्त आरमोरीहून ब्रम्हपुरीकडे येत असताना, ब्रम्हपुरीकडून येणाऱ्या अशोक लेलँड मिनी ट्रक (MH ४० CD १०८१) ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी अवस्थेत असल्यामुळे वेळीच स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने आरमोरी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

     अपघातानंतर ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. ट्रकचालक कृष्णा वाडिवे यांच्याविरुद्ध भादंवि कलम २८१ आणि १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ब्रह्मपुरी पोलिसांनी त्यांला ताब्यात घेतले आहे.

        सदर घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये