ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचाही समावेश करा

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचेकडे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांची मागणी

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र राज्यात ऊस, सोयाबीन, मिरची, कापूस, धान, इतर कडध्यान व फळबागांसह इतरही पिकाचे उत्पन्न मोठया प्रमाणावर घेतले जाते. रब्बी हंगामातही अनेक शेतकरी पिकाचे उत्पन्न घेत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमजुरांचा हातभार घेतल्या शिवाय शेत पिके घेता येत नाही. मात्र यावेळी शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याचा अपघात झाल्यास शेतकऱ्याला स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ दिल्या जाते. परंतु शेतीचे काम करीत असलेल्या शेतमजुराचा अपघात झाल्यास त्याला स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ दिल्या जात नाही. यामुळे शेतमजुरांवर अन्याय होत आहे.

 स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या कार्यकक्षा वाढवुन शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांचाही समावेश करून गेल्या वर्षभरात राज्यात शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु अथवा अपंगत्व आलेल्या सर्वशेतमजुरांना या योजनेचा लाभ द्यावा यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा याबाबतचे निवेदन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे कडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केली असुन याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल याबाबतचे आश्वासन मुंडे यांनी भटारकर यांना दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये