
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर
बल्लारपूर :- शहरचा काठेला पहिल्या नाल्यावर दुपारी एकवाजता चा दरम्यान दीनदयाळ वॉर्ड येथील रहिवासी रामअवध चौहान आणि त्याची पत्नी दोघेही बकरी चारत होते. चौहान यांची पत्नी बाजूलाच बकरी करिता चारा गोळा करीत असतांना झुडपात बसलेला वाघाने महिलेवर झडप टाकून गळ्याला पकडून फरकटच नेत असतांना पतीने आरडाओरडा केल्याने वाघाने महिलेला तिथेच टाकून जंगलात पळाला.
पतीने महिलेला तडफडत पहिले असता पत्नी मृता अवस्थेत होती.मृतक लालबच्ची चौहान (60)जबड्यात पकडल्याने महिलेची गळा तोडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. पती ने आरडाओरडा करून करावा रोड वरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना कळविले. नागरिकांनी लगेच पोलिसांना व वनविभागाला कळविले. मृतकाचे शव ग्रामीणरुग्णालयात शव विच्छेदन करिता पाठविले. वाघ जंगल परिसर सोडून शहराचा काठेवर येत आहे.
वनविभाग वेळोवेळी नागरिकांना सावधान करीत आहे की जंगलाचा दिशेने कोणीही जाऊ नये जंगली हिसक पशु पासून धोका आहे. तरीही दिवसा ढवळ्या वाघाने महिलेवर झडप घेऊन पतीचा समोरच जबड्यात पकडून फरकटच नेऊन शिकार केली आहे. पुढील तपास पोलीस व वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करीत आहे.