ताज्या घडामोडी

चाकु हल्ल्यात युवा हॉटेल व्यवसायी गंभीर जखमी – स्वप्नील मोहुर्ले यांस चंद्रपूर येथे हलविले

हॉटेल मधे दारू पिण्यास मज्जाव केल्याने झाला हल्ला - चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

हॉटेलमधे दारू पिण्यास मज्जाव केल्याने स्वप्नील मोहुर्ले नामक युवा हॉटेल चालकावर चाकुने प्राणघातक हल्ला होण्याची खळबळजनक घटना राजुरा शहरानजीक असलेल्या बामनवाडा हद्दीतील दसवारू नाल्याजवळील हॉटेल पाहुणचार समोर दिनांक 25 फेब्रुवारी रोजी रात्री 11:00 वाजताच्या सुमारास घडली असुन जखमी स्वप्नील मोहुर्ल ह्याचा मित्र वैभव निकोडे ह्याच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील युवक स्वप्नील मोहुर्ले ह्याने दसवारू नाल्याजवळ हॉटेल पाहुणचार नावाने मागील 4 महिन्यांपूर्वी व्यवसाय सुरू केला. ह्या हॉटेल मधे महिला आपल्या कुटुंबीयांसह जेवणाचा आस्वाद घ्यायला येत असतात. महत्वाचे म्हणजे हॉटेल संचालकांनी ह्या ठिकाणी धुम्रपान तसेच मद्यपानावर बंदी केली असुन ह्या ठिकाणी कुणालाही मद्य सेवन करण्यास मनाई आहे. अशातच 25 फेब्रुवारी रोजी राजुरा येथिल रितीक लांडे, राकेश उत्ताने, आकाश राठोड, व निरज चिडे है चार युवक गेले व त्यांनी हॉटेल मधे मद्यपान करण्याचा प्रयत्न केला असता संचालक स्वप्नील मोहुर्ले ह्याने त्यांना हटकले व दारू पिण्यास मज्जाव केला. ह्यामुळे संतापलेल्या चारही युवकांनी त्याचेशी वादावादी केली व हॉटेल बाहेर जाऊन शिवीगाळ सुरू केली.

दरम्यान स्वप्नील मोहुर्ले ह्यांचे मित्र वैभव निकोडे, अविनाश जाधव, बालाजी ताजणे हे रविवारची सुटी असल्याने हॉटेल मधे गेले होते तेव्हा त्यांना हॉटेल संचालकांनी घडलेला प्रकार सांगितला. प्रकरण शांत करण्याच्या उद्देशाने सर्व मित्र हॉटेल बाहेर येऊन त्या चौघांनाही शांत होण्यास समजावत असतानाच राकेश उताने व अकाश राठोड ह्यांनी स्वप्नील मोहुर्ले ह्यास धक्का देऊन खाली पाडले हिच संधी साधुन रितीक लांडे याने मागुन येऊन त्याच्या पाठीवर धारदार चाकुने जोरदार वार केला व चौघेही पळुन गेले.

चाकुचा वार झाल्याने स्वप्नील मोहुर्ले ह्यांच्या पाठीतून रक्ताची धार लागली. अखेरीस हॉटेल मधे असलेले ग्राहक आशिर्वाद चिंचाळकर, नितीन खरवडे ह्यांच्या मदतीने वैभव निकोडे, अविनाश जाधव, बालाजी ताजणे ह्यांनी गंभीर जखमी असलेल्या स्वप्नील मोहुर्ले ह्याला उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

वैभव निकोडे ह्यांच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी रितीक लांडे, राकेश उताने, आकाश राठोड, व निरज चिडे ह्यांचे विरोधात भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम 323, 326, 504, 506 व 34 अन्वये गुन्ह्याची नोंद केली पोउनी पांडुरंग हाके ह्यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये