“राष्ट्रीय ग्राहक दिन” चा कार्यक्रम
प्रमुख अतिथी यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन या विषयावर मनोगत केले व्यक्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी “राष्ट्रीय ग्राहक दिन” चा कार्यक्रम नियोजन हॉल जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. वैशाली गजभिये, अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच वर्धा प्रमुख अतिथी मा. श्री शिवराज पडोळे निवासी उपजिल्हाधिकारी वर्धा, मा. श्री विवेक दा. देशमुख सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश् वरष्ठि स्तर वर्धा, मा. श्री संजय मसंद, सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वर्धा, मा. श्री. सतिश देशमुख, अध्यक्ष अ.भा.ग्रा.पं वर्धा, मा.सौ उषा फाले, अध्यक्ष अ.भा.ग्रा. कल्याण परिषद वर्धा, मा. श्री किशोर मुटे, अ.भा.ग्रा.पं जि शाखा वर्धा, मा. श्री. अनिल मिश्रा संघटक, अ.भा.ग्रा.पं वर्धा, मा. श्री. विनोद पोटे, सचिव अ.भा.ग्रा.प.जि. वर्धा व मा. सुरेश पटटेवार, अध्यक्ष अ.भा.ग्रा.पंचायत तालुका, वर्धा तसेच प्रमुख वक्ते मा. श्री. अजय भोयर, सचिव अ.भा.ग्रा. कल्याण विदर्भ शाखा व मा. सौ.अॅड. सारीका दाभाडे विधी सल्लागार ग्रा.अ.भा.ग्रा.प वर्धा कार्यक्रमात उपस्थित होते.
तसेच श्री. शालिकराम भराडी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्धा, श्री. संदीप पुंडेकर, तहसिलदार वर्धा, श्री. अजय साबळे सहा. जि.पु.अ वर्धा, श्री. चंद्रशेखर वानखेडे धान्य खरेदी अधिकारी, वर्धा व श्रीम. मनिषा माजरखेडे, निरीक्षण अधिकारी वर्धा हे सर्व अधिकारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालक श्रीम. सुस्मिता आखाडे, सह संघटक मंत्री, वर्धा व प्रस्ताविक श्री. दिपक नानाजी बोंबले, पुरवठा निरीक्षक जि.का वर्धा यांनी केले आहे. सदर कार्यक्रमात उपस्थित प्रमुख अतिथी यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन या विषयावर मनोगत व्यक्त केले व ग्राहक मध्ये जनजागृती करिता प्रोत्साहन केले, व कार्यक्रमा अंती श्री. अनिल मिश्रा संघटक, अ.भा.ग्रा.पं वर्धा यांनी सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.