गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावठी मोहा रसायन एकूण किंमत २ लाख ३२ हजारावर माल जप्त

दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर असे की, मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरुन पंचासमक्ष पो. स्टाफ चे मदतीने प्रोरेड केला असता घटनास्थळी दि. २/८/०२३ रोजी १२ ते १२. ४५ वा. दरम्यान, मौजा पाचोळ जंगल शिवारात दिलीप चव्हाण वय ४८ वर्ष, शांतीलाल जाधव वय ४१ वर्ष दोन्ही रा.पाचोड आर्वी ता. आर्वी जि. वर्धा दोन्ही आरोपी हे मोठ्या लोखंडी ड्रममध्ये काठीने गावठी मोहा रसायन सडवा ढवळाढवळ करताना दिसले पंच व पोस्टाफचे मदतीने घेराव घालुन ताब्यात घेवुन पंचासमक्ष सदर मोक्क्याची पाहनी केली असता मौक्यावर 16 मोठ्या लोखंडी ड्रममध्ये प्रत्येकी 200 लीटर प्रमाने 3200 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा ड्रमसह जुमला किंमत 2,32,000/- रु चा माल चा मिळुन आल्याने सदर आरोपी दिलीप चव्हाण वय ४८ वर्ष, शांतीलाल जाधव वय ४१ वर्ष दोन्ही रा.पाचोड आर्वी ता. आर्वी जि. वर्धा विरुद्ध गुन्हा नोंद करुन तपासावर आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन साहेब, वर्धा, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. डॉ. सागर कवडे व उपविभागीय पोलीस अधीकारी, आर्वी श्री. देवराव खंडेराव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत काळे पो. स्टे. आर्वी यांचे प्रत्यक्ष निर्देशाप्रमाने पोहवा. सचीन धुर्वे, रामकिसन कास्देकर, नापोकॉ. दिगांबर रुईकर, राधेश्याम टेंभरे, अंकुश निचत, राहुल देशमुख, किरन कुरटकार, निलेश करडे, स्वप्नील निकुरे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये