ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
घोडाझरी ओव्हर फ्लो झाल्याने पंच क्रोशीतील पर्यटक मोठया संख्येने दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने पंच क्रोशीतील जनता आनंद घेण्यासाठी येत असल्याने घोडाझरी येथे गर्दीचे चित्र दिसून येत आहे.
नागभीड जवळील घोडाझरी लवकरच ओव्हर फ्लो झाल्याने रविवारी मोठया संख्यने पर्यटक आले होते. यावेळी वन विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता
यावेळी वन विभागाची चमू, महसूल विभाग आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभाग लक्ष ठेऊन असले तरी जंगलात कोणीही प्रवेश करू नये असे वन विभागाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे.