ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत कठीण कालो संघ दान पुण्योत्सवाचे आयोजन

११ ऑक्टोबर रोजी बुद्धलेणी विजासन येथे एकदिवसीय कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    वर्षावास आयोजन समिती, भद्रावती यांच्या वतीने “कठीण कालो संघ दान पुण्योत्सव” या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, ऐतिहासिक बुद्धलेणी, विजासन भद्रावती येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता धम्म रॅली आणि सुत्त वाचनाने होणार असून, सकाळी १०.३० वाजता भिक्खु संघास भोजनदान व चिवरदान आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता सामुदायिक अन्नदान व दुपारी १२.३० वाजता धम्मदेशन सत्र होणार आहे.

या कार्यक्रमाला आदरणीय भवंत धम्मलेन महाथेरी (येनीकोनी) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच भिक्खु सिलरत्न, भदंत धम्मवीरीय, भदंत करुणा राखिता (देवकोटर, उत्तर प्रदेश) हेही धम्मदेशन करणार आहेत.

अतिथी म्हणून पु. भदंत मैत्री बोथी (चंद्रपूर), भिक्खु धम्मानंद (केसुली), भदंत अश्वजित व चमनेर मुदितानंद (देवकोटर, उत्तर प्रदेश) उपस्थित राहतील.

कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून पु. भदंत प्रज्ञाकिर्ती महास्थविर, भिक्खु विरिया पण्यो (बुद्ध लेणी), महेंद्र गावंडे, सुशीलभाऊ देवनाडे, सुमित दुर्योधन, मिलिंद रायपुरे, इंजि. सम्राट वाघमारे, सदानंद वाघ, सुमेध गजभिये, डॉ. विनीत भरणे आदींची उपस्थिती राहणार आहे.

आयोजन समितीत लिनता जुनघरे, छाया कांबळे, शिला खाडे, शालीनी गोरघाटे, नंदा रामटेके, बि. डी. देशपांडे, विनयबोधी डोंगरे, जयदेव खाडे, सुरज गावंडे, प्रियवंद वाघमारे, धर्मराज गायकवाड, एन. डी. मेश्राम, कवडू कांबळे आदींचा समावेश आहे.

या धम्ममय आणि पुण्यसंचयाच्या सोहळ्यास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये