ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे सायबर पोलीस स्टेशनचे उद्घाटन

सायबर गुन्हेगारीमध्ये दिवसेदिवस मोठया प्रमाणात वाढ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटच्या माध्यमातुन मोठया प्रमाणात सोशल नेटवर्कींग साईट्सचा वापर होत आहे तसेच डीजिटल इंडीयामुळे प्रत्येक व्यवहार हा ऑनलाईन करावा लागतो. त्यामुळे सरकारी योजनांपासुन ते बँकेच्या व्यवहारापर्यंत संपुर्ण गोष्टी ऑनलाईन कराव्या लागतात. तसेच सोशल मिडीयाचा वापर सुध्दा लहानांपासुन ते वयोवृध्दपर्यंत करतात.

याच गोष्टींचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेत असुन सायबर गुन्हेगारीमध्ये दिवसेदिवस मोठया प्रमाणात वाढ होत आहे. त्याकरीता प्रशासनाला वेगळया सायबर पोलीस स्टेशनची गरज भासली. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे आज दिनांक २७.०६.२०२३ रोजी मा. ना. श्री. रामदासजी तडस (खासदार) वर्धा जिल्हा यांचे शुभ हस्ते सायबर पोलीस स्टेशन वर्धा चे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री. राहुल कर्डीले जिल्हाधिकारी वर्धा उपस्थित होते. प्रमुख पाहुन्यांचे स्वागत श्री. नूरूल हसन पोलीस अधीक्षक वर्धा यांचे हस्ते करण्यात आलेले असुन सदर कार्यक्रमास डॉ. श्री. सागर कवडे अपर पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सत्यजित आमले पोलीस उपअधीक्षक (गृह), श्री. काचंन पांडे पोलीस निरीक्षक, (ठाणेदार) सायबर पोलीस स्टेशन, श्री. संजय गायकवाड पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, श्री. संदीप कापडे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. विनीत घागे सहा. पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा, श्री. प्रफुल डाहुले वाचक फौजदार व ईतर पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर होते.

नव्याने सुरु करण्यात आलेल्या सायबर पोलीस स्टेशन मध्ये एक लाख रुपयावरील ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत होणारे गुन्हे दाखल होणार असुन सोबतच ईतर पो.स्टे. ला सुध्दा गुन्हे दाखल होणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये