ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलगी ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर असे की, यातील फिर्यादीने दि. २१.०२.२०२५ रोजी पोलीस स्टेशन वर्धा येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे १७ वर्षे हिला अज्ञात आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावुन पळवून नेले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन वर्धा येथे अप क्र. २५८/२०२५ कलम १३७(२) बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तथा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्फतीने करीत असताना मा. श्री अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शक पथक तयार करण्यात आले. गुन्ह्यात मुखबिर लावून व तांत्रिक तपास करून यातील आरोपी नामे सुखराम मदनलाल चव्हाण, वय २८ वर्ष रा. ग्राम जामनिया ता. हाटपिपालीया जि. देवास (मध्यप्रदेश) येथे असल्याची खात्री झाल्याने पथक रवाना करून नमूद आरोपीस व यातील पीडित अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले. आरोपी यास रीतसर कायद्याप्रमाणे अटक करण्यात आली असून पुढील तपास पो स्टे वर्धा करीत आहे यातील अल्पवयीन मुलगी रीतसर कायद्याप्रमाणे पो स्टे वर्धा यांच्याकडे देण्यात आले आहे.

  सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री सागर रतनकुमार कवडे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात सपोनी माधुरी वाघाडे, पोउपनि बालाजी लालपालवाले यांचेसह स.फौ. सुभाष राऊत, पो.हवा. नितेश मेश्राम, म.पो.हवा. अर्चना जाधव, पो.शि. नवनाथ मुंडे असे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा, पो.हवा. अनुप कावळे, अक्षय राउत, गोविंद मुंडे, सायबर सेल वर्धा, म.सफौ छाया तेलगोटे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये