वणी क्षेत्राच्या ऊर्जा ग्राम मुख्यालयात आंतर क्षेत्रीय प्राथमिक उपचार प्रतियोगिता
वेकोलीच्या 35 संघांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वेकोली वणी क्षेत्राच्या ऊर्जा ग्राम मुख्यालयात वेकोलीच्या आंतर क्षेत्रीय प्राथमिक उपचार प्रतियोगेतीला दिनांक तीन रोज सोमवारला सुरुवात करण्यात आली. सदर प्रतियोगितेच्या उद्घाटन प्रसंगी वेकोली मुख्यालयाचे एस अँड सी रेवतकर, डॉक्टर मोघे,वेकोली वणी क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंह, आर आर डी चे चैतन्य कुमार, उपक्षेत्रिय प्रबंधक संजय मिश्रा, जीबीटीसी इन्चार्ज गारगाटे आणि पथक, वनी क्षेत्राचे सुरक्षा अधिकारी तथा रेस्क्यू मेंबर उपस्थित होते. सदर प्रतियोगितेत वेकोलीच्या चंद्रपूर, बल्लारपूर, माजरी, पेंच,पाथरखेडा, उमरेड, वनी, वनी नॉर्थ,नागपूर, कन्हाण क्षेत्रातील 35 संघाने सहभाग घेऊन आपत्कालीन परिस्थितीत उपायोजना करण्याचे प्रात्यक्षिके सादर केले. विशेष म्हणजे या संघांपैकी आठ संघ महिलांचे आहेत.
प्रतियोगितेत कोळसा खाणीत आपातकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रथम अपघात स्थळी पोहोचणे, जखमींवर प्राथमिक उपचार करणे व त्यांना रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करणे याची प्रात्यक्षीके प्रत्येक संघाने सादर केली.सदर प्रतियोगिता दोन दिवस चालणार आहे.