ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानोली खु. येथे रोजगार हमीच्या कामासाठी करण्यात आली सामुहिक वन हक्क क्षेत्राची शिवार फेरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 मानोली खु. ला अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अन्वये २७/०६/२०१७ ला सर्वे न. ४२ मध्ये ७९.८३ हे. आर क्षेत्राचे सामुहिक वन अधिकार मिळाला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी साठी म्हणून गावात सामुहिक वन हक्क व्यवस्थापन समिती च्या वतीने सामुहिक वन हक्क क्षेत्रात शिवार फेरी चे आयोजन 4 मार्च रोजी करण्यात आले होते,

 ३० नोव्हेंबर २०२१ च्या महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे सामुहिक वन हक्क ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित केल्या जाऊ शकतात. या निर्णयानुसारच ग्रामसभा मानोली खु. ची नोंद पोर्टल ला झालेली आहे.

त्याच अनुषंगाने या वर्षी कोणकोणते कामे सामुहिक वन हक्क क्षेत्रात घेऊ शकतो यासाठी म्हणून गावातील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात या शिवार फेरीत सहभागी झाले होते. या हंगामात जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा व जंगलाचे संरक्षण, संवर्धन व्हावे या उदेशाने कामाची यादी देखील केल्या गेली. तसेच गावात कामाच्या मागणीचा नमुना ४ आणि नवीन जॉब कार्ड नोंदणी फॉर्म देखील भरण्यासाठी कॅम्प चे आयोजन केले गेले होते.

या साठी सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे मनीषा सिडाम, नत्थूजी निकोडे, दशरथ कोवे, पेसा मोबलाझर, वनरक्षक श्री पेंदोर, मेट, बेअरफुट टेक्नीशियन, टाटा सामाजिक विज्ञान संस्थान चे प्रतिनिधी मार्गदर्शक अमोल कुकडे, जगदीश डोळसकर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये