ताज्या घडामोडी

अधिक मासानिमित्य महिला मंडळ राजुरा ने केले शाळेत नोटबुक पेन्सिल वितरण

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा शहरातील सर्वात जुन्या महिला मंडळाने अधिक मासाच्या पावन पर्वाचे औचित्य साधुन शहरातील नगरपालिकेच्या झाकीर हुसेन प्राथमिक शाळा व नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन्सिल व बिस्कीट पुड्यांचे वितरण करण्यात आले.

महिला मंडळाने घेतलेल्या ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून गोपिकाबाई सांगडा आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका छाया मोहितकर उपस्थित होत्या,  झाकीर हुसेन शाळेच्या मुख्याध्यापिका संतोषी मडावी आत्राम व नेताजी सुभाषचंद्र शाळेच्या निवेदिता ताम्हण ह्यांनी कार्यक्रमाच्या अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महिला मंडळाच्या उपाध्यक्षा स्वरुपा झंवर ह्यांनी भूषविले.

कार्यक्रमाची सुरुवात व संचलन मंडळाच्या सचिव श्वेता अपराजित ह्यांनी श्री विष्णू स्तुती श्लोकाने केली. तसेच विद्यार्थ्यांना अधिक मास का साजरा करण्यात येतो, ह्या महिन्याचे वैशिष्ट्य काय तसेच कालगणना व्यवस्थित करण्याकरिता ह्या महिन्याचा उपयोग कसा होतो ह्याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या विकास व प्रगतीबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या छाया मोहितकर ह्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देताना विद्यार्थ्यांना सांगितले की त्या सुद्धा मराठी माध्यमात शिकल्या असुन त्यांचे शिक्षण नगर पालिकेच्या तत्कालीन कन्या शाळेतच झाले आहे. त्यांनी आपले शैक्षणिक व बालपणाचा महत्त्वाचा काळ ह्याच पटांगणावर काढला, ह्याच पटांगणात इतरांकडून मार्गदर्शन घेताघेता आज इथेच नविन पिढीला मार्गदर्शन करण्याची संधी प्राप्त झाली ह्याबद्दल आनंद व्यक्त करताना महिला मंडळाचे आभार व्यक्त केले. सेवानिवृत्त शिक्षिका अल्का सदावर्ते यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व विषद केले. स्वरुपा झंवर ह्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केलेल्या परिश्रमाबद्दल मंडळाच्या सदस्यांचे कौतुक आपल्या अध्यक्षीय संबोधनात केले.

कार्यक्रमाला महिला मंडळाच्या सदस्या सगुणा अवधुत, पुजा घरोटे, शुभांगी वाटेकर, प्रतिभा भावे, कल्पना वझलवार, कल्याणी देशमुख, वर्षा कोंडावार, माणिक देशपांडे, ऋचा देशपांडे, वैजयंती देशकर, राजश्री देशपाडे, सिमा देशकर, सिमा देशमुख, राधीका धनपावडे, कल्पना देशकर, माया उपगन्लावार च्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थिती दर्शविल्याबद्दल राजुरा महिला मंडळाच्या सचिव श्वेता अपराजित ह्यांनी आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये