ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रशासकीय अधिकारी कामाच्या वेळेस चक्क बारमध्ये

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना :- कोरपणा पंचायत समिती कार्यालयातील एका विभागाचे प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासनअधिकारी हे दोघे जण कामाच्या वेळेस दुपारी १ ते २ च्या सुमारास कोरपणा येतील एका बारच्या खोलीत बसून चक्क ओली पार्टी करीत असल्याचा व्हिडिओ हाती लागला त्यामुळे पंचायत समिती प्रशासनात कमालीची खडबड माजली आहे.

सदर व्हिडिओची पुष्टी करत नसून शुक्रवारी२० सप्टेंबर चा हा व्हिडिओ असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे शुक्रवारी रोजी कोरपना येथे आठवडी बाजार असते यानिमित्ताने नागरिक आपापले कामे घेऊन पंचायत समितीमध्ये येतात मात्र तेथील काही जबाबदार अधिकारी अशा पद्धतीने कामाच्या वेळेस बार मध्ये बसून दारू पीत असेल तर कामाचे काय असा प्रश्न विचारला जात आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये