ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

त्या शिक्षकांना केंद्रप्रमुखच्या परीक्षेपासून वंचित ठेऊ नका

शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांचेकडे केली मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

विधान परिषदेचे शिक्षक आमदार सन्माननीय श्री सुधाकर जी अडबाले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पन्नास टक्के पेक्षा कमी गुण व पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या शिक्षकांना ज्या पद्धतीने केंद्रप्रमुखाच्या परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले आहेत त्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा यासाठी भेट घेतली आमदारांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली असून परीक्षा परिषदेसोबत ते चर्चा करणार आहेत असे त्यांनी आश्वासित केले तसेच परीक्षा लांबल्यास विधानसभेमध्ये अधिवेशनात देखील हा मुद्दा लक्षवेधी म्हणून मांडणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले यावेळी अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे चंद्रकांत पांडे, मोहन वाभीटकर, विलास कुडे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नामदेव ठेंगणे, नामदेव जाधव नीलकंठ खरबे, काकासाहेब नागरे,व इतर शिक्षक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये