ताज्या घडामोडी

गिरीशजी चांडक यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाधार महिला निवासगृह , इंदिरानगर येथे आवश्यक वस्तूंचे वितरण

चांदा ब्लास्ट –

चंद्रपूर,
शहरातील सुप्रसिद्ध समाधान पूर्ती सुपर बझार चे संचालक, विदर्भ इंग्लिश मिडीयम ट्रस्टी असोसिएशन चंद्रपूर चे अध्यक्ष, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन डेव्हलोपमेंट असोसिएशन चंद्रपूर चे अध्यक्ष, गुरुकुल शिक्षा संस्थेचे (श्री महर्षी विद्या मंदिर ) अध्यक्ष आणि चंद्रपूर चे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते . गिरीश चांडक यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर येथील सरस्वती शिक्षण महिला मंडळ द्वारा संचालित स्वाधार महिला निवासगृह, कौटुंबिक सल्ला व समुपदेशन केंद्र तसेच सखी वन स्टॉप सेंटर , इंदिरानगर येथे भेट देऊन तेथील संचालकांना ३५ बेडशीट , ३५ पिलोकवर आणि खुर्च्या दिल्या.
आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे आपल्या मिळकतीचा काही भाग समाजासाठी खर्च करावा. आपल्या वाढदिवसानिमित्त तेथील महिलांसोबत हितगुज करण्याची संधी मिळाली आणि भेटवस्तू दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून मनाला आनंद झाला, अशी भावना चांडक जी यांनी व्यक्त केली.
स्वाधार महिला निवासगृहा च्या संचालकांनी आणि तेथील महिलांनी गिरीश चांडक यांना अक्षवंत केले. तसेच त्यांनी दिलेल्या भेटीबद्दल आभार व्यक्त केले.
याप्रसंगी गुरुकुल शिक्षा संस्थेचे सचिव  दत्तात्रय कंचर्लावार , सदस्य वीरेंद्र जयस्वाल आणि  अलका चांडक तसेच श्री महर्षी विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका  श्रीलक्ष्मी मूर्ती आणि उपमुख्याध्यापिका  निशा मेहता उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये