ताज्या घडामोडी

नंदोरी येथे शासकीय आधारभूत दराने सी.सी.आय. तर्फे कापूस खरेदीला सुरुवात

कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती अंतर्गत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीच्या अंतर्गत उपबाजार आवार नंदोरी येथील मे.अदिती काँटन इंडस्ट्रीज (टाकळी) नंदोरी येथे सोमवार दिनांक 18 /11/ 2024 ला सी.सी.आय. मार्फत शासकीय आधारभूत दराने कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती श्री. भास्कर लटारी ताजने यांच्या शुभहस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

पहिल्या दिवशी 14 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून रुपये 7521 /-प्रति क्विंटल इतका हमीभाव देण्यात आला .याप्रसंगी बाजार समितीचे संचालक राजेंद्र डोंगे,प्रविन बांदुरकर, गजानन उताणे,शरद जांभुळकर, श्यामदेव कापटे , माजी संचालक अजित फाळके, तसेच बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर यांच्यासह सी. सी. आय. भद्रावतीचे केंद्रप्रमुख श्री निळकंठ अकोटकर मे. अदिती कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक श्री अविश बाहे,तसेच शेतकरी विश्वास कोंगरे,संतोष माडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या शुभहस्ते शाल व श्रीफळ देऊन पहिल्या दिवशी कापूस विक्रीसाठी आलेले शेतकरी मोरेकांत हरिदास लेडांगे टाकळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम आयोजनासाठी बाजार समितीचे कर्मचारी संजय शेंडे, विलास पालकर ,रोहित शेडामे तसेच मापारी अरुण पाठक यांनी सहकार्य केले. (शेतमाल विक्रीस आणण्याचे आवाहन) चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपआपला कापूस भद्रावती तालुक्यातील उपबाजार आवार, नंदोरी येथील मे. अदिती कॉटन इंडस्ट्रीज (टाकळी )नंदोरी येथे आधार कार्ड (मोबाईल क्रमांक लिंक केलेला) अद्यावत पीक पेरा असलेला 7/12, बँक पासबुक, इत्यादी कागदपत्र तयार करून कापूस नोंदणी करावी.

सदर केंद्रावर सी.सी.आय. द्वारे शासकीय आधारभूत दराने कापूस खरेदीला सुरुवात झालेली असून नोंदणी करून विक्रीस आणावे असे संयुक्त आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीचे सभापती भास्कर लटारी ताजने, उपसभापती सौ अश्लेषा मं.भोयर (जीवतोडे) आणि सचिव नागेश पुनवटकर व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये