ताज्या घडामोडी

गोळीबारासह दुकानात पेट्रोल बॉम्ब फेकले – एक जखमी

मालू ह्यांना यापूर्वीही झालाय लुटण्याचा प्रयत्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

प्रशांत रणदिवे, बल्लारपूर

शहरात वस्ती विभागात एका दुकानात गोळीबारी व बॉम्ब टाकून जाळण्याचे प्रयत्न केल्याची घटना घडली असून गोळीबारात एक जण जखमी झाले. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

वस्ती विभागातील मालू बंधूचे सर्वात जुने मोतीलाल प्रभुलाल मालू नामक कपड्याचे दुकान असून आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अभिषेक मालू यांनी दुकान उघडताच काही वेळाने तीन अज्ञात इसमांनी मोपेड वर येऊन ३ फेऱ्या गोळीबार करीत दुकान जाळण्याच्या उद्देशाने दोन पेट्रोल बॉम्ब फेकले. या गोळीबारात दुकानातील नोकर कार्तिक साखरकर वय २५ वर्ष यांचा पायाला गोळी लागली असून त्याला उपचार्थ चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ह्यापूर्वी अभिषेक मालू ह्यांचेवर दुकान बंद करून घरी जात असताना काही युवकांनी लूटपाटीच्या उद्देशाने हल्ला झालं होता मात्र आज त्यांच्या दुकानावर दिवसाढवळ्या चक्क गोळीबार झाल्याने वस्ती विभागात घबराट निर्माण झाली असून दुकानदारांनी आप आपले दुकान बंद करून आरोपींना पकडण्याची मागणी करत आहेत. सदर घटनेचा बल्लारपूर व्यापारी संघटनेने तीव्र निषेध केला असुन शहरातील कायदा व सुव्यवस्था चोख करण्यासोबतच हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये