ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपनाचे क्रीडा संकुल समस्यांच्या विळख्यात

खेळाडूंची गैरसोय ; अनेक कामे अपूर्ण 

चांदा ब्लास्ट

कोरपना – येथील तालुका क्रीडा संकुलनातील अद्यापही अनेक कामे परिपूर्ण न झाल्याने अर्धवट पडले आहे. ती कामे त्वरित पूर्ण करावी अशी अपेक्षा क्रीडा प्रेमी कडून व्यक्त होत आहे. येथील क्रीडा संकुलनाचे काम निर्मिती प्रक्रियेपासूनच अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यातील काही कामे टप्प्याटप्प्यात झाली. परंतु आजपर्यंत एक ही काम पूर्णपणे झाले नाही. त्यामुळे झालेल्या कामाची दुरावस्था होत चालली आहे.

आजच्या घडीला क्रीडा संकुलनातील विविध खेळाचे मैदाने, पक्की संरक्षण भिंत, विद्युत पथदिवे आदीचे काम झाले नाही. बांधण्यात आलेल्या क्रीडा भवनाची नासधूस झाली असून येथील दरवाजे खिडक्या, पाईपलाईन, स्टाईल आदी मोडकळीस आले आहे. स्वच्छतागृह ही अस्वच्छतेने बरबटले आहे. संकुलाचे मुख्य प्रवेशद्वार मागील वर्षभरापासून तसेच तुटून अडगळीत पडले आहे. परंतु त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. अलीकडेच येथे विद्युत मीटर लावण्यात आले.मात्र विद्युत व्यवस्था करण्यात आली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली. त्यालाही मुबलक पाणी लागले नाही. त्यामुळे दुसरी बोरवेल खोदण्याची गरज आहे. क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात झुडपे ही वाढली गेली आहे. त्यांचे ही व्यवस्थापन होणे महत्त्वाचे आहे. रनिंग ट्रॅक, पादचारी ट्रॅक, सभोवताल वृक्ष लागवड, प्रेक्षागृह, मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, खेळण्यासाठी हॉल आदी सुविधा होणे अपेक्षित आहे.

 क्रीडा संकुल प्रवेशद्वार वर नाम फलक ही नाही

क्रीडा संकुलातील आज ही अनेक कामे अपूर्ण आहे. यातच वीस वर्षाच्या कालावधीत अजून पर्यंत क्रीडा संकुल पुढे नाम फलक लागले नाही. तसेच हा परिसर ही संपूर्ण ओसाड वाटतो. त्यामुळे क्रीडा संकुल कोणते आहे.हे नवीन व्यक्तींना कळतं नाही. त्या दृष्टीने येथे फलक लावणे आवश्यक आहे.

 क्रीडा विभागाचे दुर्लक्ष

 कोरपना येथील तालुका क्रीडा संकुल कडे निर्मिती काळापासूनच क्रीडा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी हे संकुल अडगळीत पडले आहे. त्याचा फटका या परिसरातील होतकरू खेळाडूंना बसत आहे. तसेच लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये