क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोटर चोरी करणारे आरोपींना दोन तासात हिंगणघाट डीबी पथकांनी केले अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 12/07/23 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे येऊन तक्रारदार नामे कैलास महादेवराव वाणी रा. नांदगाव बोरगाव यांनी तक्रार दिली की, त्यांनी लावलेली शेती कामाकरिता शेतातील वना नदिचे थडीवर पाणी ओलीत करीता लावुन असलेली किर्लोस्कर कंपनिची सी. जी. मोटार किंमत 30000 रु दिनांक 09/07/2023 चे 10/30 वा. ते दिनांक 12/07/2023 चे 10/30 वा. दरम्यान कोनीतरी अज्ञात चोराने चोरुन नेली आहे.फिर्यादीने दिलेल्या अशा तक्रारी वरून पोलीस स्टेशनला अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर गुन्ह्यात हिंगणघाट येथील डीबी पथक यांनी आरोपीचा शोध घेऊन अवड्या दोन तासात आरोपी क्र 1… कार्तिक पद्माकर मेश्राम वय 34 वर्ष 2… गजानन वामनराव टिपले वय 40 वर्ष 3… राहुल देवराव निकुरे वय 30 वर्ष … 4…गजानन संभाजी गेडाम वय 39 वर्ष सर्व राहणार ..संत कबीर वार्ड हिंगणघाट यांचे ताब्यातून चोरीस गेलेली मोटार व गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल हस्तगत करून आरोपींताना अटक केली. सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब नुरूल हसन अप्पर पोलीस अधीक्षक श्री सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री रोशन पंडित यांचे निर्देशाप्रमाणे हिंगणघाट पोलिस स्टेशन हिंगणघाट चे ठाणेदार श्री कैलास पूडकर डीपी पथकाचे पोलीस अमलदार पोहवा नरेंद्र डाहाके ना. पो. का प्रवीण बोधाने, अजहर खान, प्रमोद डडमल, दीपक मस्के यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये