ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मतदार जनजागृतीपर ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…’ हे पथनाट्य सादर करून परिसरातील वातावरण केले मंत्रमुग्ध

एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील एन.सी.सी.छात्र सैनिक, रोव्हर्स-रेंजर्स व रासेयो स्वयंसेवकांचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : स्थानिक आठवडी बाजारात महत्वाच्या ठिकाणी एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील एन.सी.सी.छात्र सैनिक, रोव्हर्स-रेंजर्स व रासेयो स्वयंसेवकांनी 15 मार्चच्या सायंकाळी मतदार जनजागृतीपर ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो……’ हे पथनाट्य’ सादर करून परिसरातील वातावरण मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी नायब तहसीलदार डाॅ. शकुंतला पाराजे, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, एन.सी.सी. अधिकारी तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, प्रा.जगदीश यावले, रोव्हर लिडर संतोष तुरक, मनोज वंजारी, श्वेता खराबे, बंडू पेटकर, गृहरक्षक दलाचे नरेश जोशी व तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर जनजागृती अभियान 45 देवळी विधान सभा संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी प्रियांका पवार व देवळीचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

सदर जनजागृतीपर पथनाट्यात कॅप्टन मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेंजर वैष्णवी शिरभाते, आकाश कन्नाके, अस्मिता दडांजे, रितेश बुटे, पायल चौके, समिक्षा मराठे, साक्षी येळणे, रसिका बानकर, देवीका मगरे, आदित्य तामगाडगे, आदर्श नाईक, प्रितेश बोडे, सुजल पराते, निशांत शितळे, विशाखा कोकाटे यांनी कलाकार म्हणून उत्तम भुमीका सादर केल्यात.

यशस्वीतेकरीता सिनिअर अंडर ऑफिसर शेखर भोगेकर, अंडर ऑफिसर अक्षय जबडे व खुशी पचारे यांनी मदत केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये