ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पूरग्रस्तांना मिळणार भरीव आर्थिक मदत – तहसीलदार समवेत भाजपा पदाधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

तुकुम परिसरातील नाला बांधकामासाठी २ कोटी ; पालमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

चांदा ब्लास्ट

तुकुम परिसरातील नागरिकांना पुरस्थितीचा सामना यापुढे करावा लागू नये म्हणून औष्णिक विद्युत केंद्र(सिटीपीएस) ते क्राईस्ट हॉस्पिटल पर्यत एका मोठ्या नाल्याचे बांधकाम केले जाणार आहे.यासाठी खनिज विकास निधीतून 2 कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने उपलब्ध झाला आहे.हेच नाहीतर पूरग्रस्तांना प्रति कुटुंब 5 हजार रु मदत दिली जाणार आहे अशी माहिती तहसीलदार विजय पवार यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिली.ते तुकुम परिसरातील पूरग्रस्त भागाची भाजपा पदाधिकऱ्यांसोबत  पाहणी करतांना बोलत होते.
यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,महासचिव सुभाष कासंगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,माजी महापौर राखी कंचर्लावार,युवानेते विशाल निंबाळकर, विठ्ठलराव डुकरे,रवी लोणकर,माजी नगरसेवक रवी आसवानी,प्राचार्य प्रज्ञा बोरमवार,अरविंद मडावी,आशीष ताजने,मयूर भोकरे,रोहित भीसेकर,अनिल मत्ते,माया मंदाडे,अमोल तंगडपल्लीवर,भाऊराव ताजने,संजय कोत्तवार,विपीन थेरे व दिलीप बुरडकर यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात 18 व 20 जुलैला पावसाने कहर केला.महानगरात 24 तासात 240 मिमी पाऊस झाल्याने  तुकुम परिसरातील द्वारकानगर,राऊत ले आउट,वानखेडे वाडी व महेश नगर येथे 4 ते 5 फूट पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने शेकडों कुटुंबियांना याचा फटका बसला.याची दखल घेत नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार यांनी मदतीचा हात देत अनेकांना सुरक्षित स्थळी पाचारण केले.विशेष म्हणजे याकडे कासंगोट्टूवार यांनी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले होते. सोमवारी या परिसराची तहसीलदार समवेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.रेल्वे लाईन चा बाजूला औष्णिक विद्युत केंद्राने उभी केलेली भिंत व अतिक्रमणामुळे पाणी अडले व यातून तेथे गुढघ्याच्यावर पाणी साचले,हे स्पष्ट झाल्याने आता तेथे मोठा नाला बांधला जाणार आहे.हेच नाहीतर येथील पूरग्रस्तांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.नागरिकांनी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

भाजपा मदतीसाठी सदैव तत्पर-डॉ.मंगेश गुलवाडे

जनतेवर कोणतेही संकट आले तर,भारतीय जनता पार्टी मदत करण्यास सदैव तत्पर असते,असा अनुभव जनतेला आहे.कोरोना काळातील भाजपाचे कार्य कुणी विसरू शकत नाही.लोकसेवा हाच आमचा धर्म आहे.पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळवून देऊ असे आश्वासन भाजपा मा.जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये