ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेड राजा मतदार संघामध्ये आज दोन अपक्ष उमेदवारने भरले नामांकन अर्ज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

मा. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पासून नामांकन अर्ज विक्री सुरु आहे.

निवडणूक उमेदवारांचे अर्ज हे मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या तहसील कार्यालय येथील दालनामध्ये अर्ज स्वीकृती होणार आहे. अर्ज स्वीकृती साठी उमेदवारा सोबत फक्त 5 व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे, आज दि. 24 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 24- सिंदखेडराजा मतदारसंघांसाठी 49 व्यक्तींनी एकूण 93 नामांकन अर्ज घेतले आहेत.

तसेच आज दोन व्यक्तींनी अपक्ष म्हणून नामांकन अर्ज भरले आहेत, पहिला अर्ज श्री.सय्यद मुबीन सय्यद नेईम यांनी भरला तर दुसरा अर्ज हा श्री. रामदास मानसिंग कहाळे यांनी भरला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये