आरोग्य प्रशासनाने ठोकले ख्रिस्तानंद हाॅस्पिटलला सिल
तिघांची दृष्टी गेली., वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :_ तालुक्यातील अत्यंत नामांकित आणि सेवाभावी समजल्या जाणाऱ्या ख्रिस्तानंद रुग्णालयावर आरोग्य प्रशासनाने मोठी कारवाई करुन चंद्रपूर जिल्ह्यात व ब्रम्हपुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ख्रिचन मिशनरी तर्फे चालविल्या जात असलेल्या या रुग्णालयात अल्प दरात सेवा मिळत असल्याने रुग्णांचा गडचिरोली जिल्ह्यातील तसेच भंडारा जिल्ह्यातील जवळपास गावातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात ओघ असतो.
मात्र मागील काही दिवसांपूर्वी येथे झालेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर जंतूसंसर्ग झाल्याने काही दिवसांत तब्बल तीन रुग्णाना आपली दृष्टी गमवावी लागल्याच्या तक्रारी जिल्हा शल्य चिकीत्साकडे प्राप्त झाल्या होत्या. आरोग्य विभागाने एक विशेष समिती गठीत करून समितीने रुग्णालयाची प्राथमिक पाहणी केली असता रुग्णालयात आढळलेली प्रचंड अनियमितता आणि मुंबई नर्सिंग होम ॲक्ट१९४९ नुसार असलेल्या नियमांचे गंभीर उल्लंघन पाहता जिल्हा शल्य चिकित्सकांनी या रुग्णालयाची नोंदणी क्रमांक १०८ पुढील आदेशापर्यंत तात्काळ रद्द केली आहे.
प्रशासनाने रुग्णालयातील सर्व शस्त्रक्रिया गुह व संबंधित विभागांना टाळे ठोकले असुन अहवाल सादर करण्याचे आदेश ख्रिस्तानंद रुग्णालय प्रशासक फादर शिजो जाॅर्ज पनायेलील यांना दिले आहे. फक्त बाहयरुग्ण विभाग सुरू राहणार आहे असे डॉ. महादेव चिंचोळे ,जिल्हा शल्य चिकीत्सक, चंद्रपूर यांनी सांगितले आहे.



