ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू विक्रीवर कारवाई

विठ्ठल मंदिर वार्ड परिसरातील छाप्यात १ लाख ७३ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २७/०४/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंगवर असताना, त्यांना विठ्ठल मंदिर वार्ड येथे अवैध दारूचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने विक्की चौधरी बाच्या घरावर छापा टाकला. पोलिसांना पाहताच आरोपी विक्की चौधरी घटनास्थळावरून पसार झाला, मात्र, घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू आणि बिअरचा साठा आढळून आला.

या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे रॉयल स्टॅग विदेशी दारू, १४४ शिश्या (किंमत ५०,४००/- रुपये), प्रिमियम नं. १ देशी दारू ६०० शिश्या (किंमत ६०,०००/-रुपये) टुबर्ग बिअर १०७ कॅन (किंमत ३७,४५०/- रुपये), कासबर्ग बिअर १७ कॅन (किंमत ५,९५०/-रुपये), ब्लू स्टार फ्रीझर १ नग (किंमत २०,०००/- रुपये), एकूण किंमतः १,७३,८००/- रुपये. या प्रकरणी आरोपी विक्की चौधरी याच्या विरुद्ध हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), ७७ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या थेट निर्देशात पो, हवा, अमरदीप पाटील, दीपक जंगले, पवन पन्नासे, पो, अं. रितेश कुन्हाडकर आणि मंगेश आदे यांनी पार पडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये