श्रीमती शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
माणसातील माणूसपण जपणारा एक हृदयस्पर्शी क्षण नुकताच अनुभवायला मिळाला. प्रतिकूल परिस्थितीतही नीतिमत्ता, राष्ट्रप्रेम आणि संघर्षाची प्रेरणा देणाऱ्या मातृत्वाचा सन्मान करत “स्वराज्य फिल्म. प्रोडक्शंन् सोशल फाउंडेशन , महाराष्ट्र राज्य” प्रणित “ यांच्या वतीने श्रीमती शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांना सन २०२६ चा “ दादासाहेब फाळके पुरस्कार” प्रदान करण्यात आला.श्रीमती शेवराबाई ज्ञानदेव भोसले या पारधी समाजातून आलेल्या असून अत्यंत हालअपेष्टा आणि संघर्षमय जीवनातून त्यांनी आपल्या तब्बल दहा मुलांना केवळ वाढवलेच नाही, तर त्यांना समाजसेवक म्हणून साहित्यिक नामदेव शेवराबाई ज्ञानदेव भोसले ,महाराष्ट्र शासन पुरुकृत लेखक भास्कर भोसले महात्मा गांधी विद्यालयात शिपाई म्हणून काम करत आहे दैना कादंबरीमुळे पारधी समाजाला न्याय मिळाले लहान मुलगा पत्रकार म्हणून निस्वार्थी ने काम करत आहे तुकाराम भोसले मोठा मुलगा चिंतामणी हायस्कुल मध्ये काम करत आहे
पिंपरी चिंचवड पुणे येथे सन्मान करण्यात आला ,रस्त्यावर, पालात राहून, भिक्षा मागून आणि अत्यंत कठीण परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. अनेकदा त्यांनी मुलांमध्ये आत्मविश्वास, संस्कार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण केली. अनेक पुरस्कार आदर्श माता म्हूणन मिळाले आहेत,अनेक मुलामुलींना आदिवाशी पारधी समाजाला मार्गदर्शन केले ,अनेक कुटुंबाचे संसार बसून दिले अलीकडेच त्यांना तब्बल आठ वेळा हृदयविकाराचे झटके आले असून डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर संकेत दिले होते. ही बाब समजताच, त्या हयात असतानाच त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा या भावनेतून समितीने नियोजित कार्यक्रमाची वाट न पाहता तातडीने त्यांना सन्मानित केले.या सन्मानप्रदान सोहळ्यास आदर्श समितीचे कार्यकारी अध्यक्ष गिरीष शिवदास राजुकर ,खुशी बोदडे, साक्षी बोदडे , सूरज खंडारे साहित्यिक समाजसेवक नामदेव शेवराबाई ज्ञानदेव भोसले, तुकाराम ज्ञानदेव भोसले,पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले, सुजाता ज्ञानदेव भोसले,ग्रीष्म तुकाराम भोसले, बलवार पवार,अजय पवार,स्वप्रित भास्कर भोसले,उपस्थित होते.
श्रीमती शेवराबाई ज्ञानदेव भोसले यांच्या कार्याची दखल राज्य स्तरावरही घेण्यात आली असून त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. तसेच .अशा या प्रेरणादायी मातृत्वाचा सन्मान करत “ दादासाहेब फाळके पुरस्कार” प्रदान करण्यात आल्याने समाजात त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.



