ताज्या घडामोडी

शालेय जलतरण स्पर्धेत मुग्धा मुसळे विभागीय स्तरावर करणार शाळेचे प्रतिनिधित्व

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

जिल्हास्तरीय शालेय जलतरण क्रिडा स्पर्धेत बामनवाडा-राजुरा येथील स्टेला मॅरीस शाळेची विद्यार्थीनी मुग्धा मुसळे हीने जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय मिळविला असून विभागस्तरावर जिल्हा व शाळेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिने पात्रता प्राप्त केली आहे.

क्रिडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रिडा परिषदेच्या वतीने बल्लारपूर तालुका क्रिडा संकुलात सुरू असलेल्या जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत राजुरा तालुक्यातील स्टेला मॅरीस कान्वहेंटची इयत्ता 9 वी ची विद्यार्थीनी मुग्धा नितिन मुसळे हीने 17 वर्षाखालील मुलींच्या वयोगटातील 50 मिटर फ्रिस्टाईल जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून तीची विभागस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. राजुरा तालुक्यातून जिल्हास्तरावर जाणारी ती एकमेव स्पर्धक आहे. तीच्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापीका सिस्टर ॲल्फी डिएम, सिस्टर प्रभा डिएम, क्रिडा शिक्षीका भार्गवी कोडाली, भास्कर फरकाडे ह्यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये