ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाळकरी विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेकरीता पोलीस प्रदर्शनीचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिनांक ०२.०१.२०२४ ते ०८.०१.२०२४ पर्यंत महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात येत असतो. त्यानिमित्याने वर्धा पोलीस दलातर्फे दिनांक ०४.०१.२०२४ व ०५.०१.२०२४ रोजी शाळकरी विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेकरीता पोलीस प्रदर्शनीचे आयोजन पोलीस मुख्यालय, वर्धा येथे सकाळी १०.०० वा. ते ०६.०० वा. पर्यंत करण्यात आले आहे.

त्यामध्ये पोलीस विभागातील मॉडेल पोलीस स्टेशन, सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ जागृती, वाहतूक विभाग, शस्त्रे व दारूगोळा, पोलीस वाहने, डॉग स्कॉड, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, फॉरेन्सीक व्हॅन, बॅन्ड पथक असे विविध स्टॉल लावून विद्यार्थी व जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

    सदर प्रदर्शनीबाबतची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांपर्यंत पोहचवण्याकरीता जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालये ग्रामपंचायत, नगरपालिका, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जनतेला माहिती मिळावी म्हणून या प्रदर्शनीस भेट देण्याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षक वर्धा यांचेतर्फे करण्यात येत आहे, जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा!

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये