ताज्या घडामोडी

आरोग्य विभागात मेगा भरती

तब्बल 10 हजार 949 पदासाठी आजपासून भरती प्रकिऱ्या

चांदा ब्लास्ट :

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली आरोग्य विभागाची मेगा भरती आज पासून सुरू होत आहे.. जवळपास 10 हजार 949 पदासाठी ही भरती प्रकिया राबविली जाणार असून त्याची जाहिरात मंगळवारी (म्हणजे आजच) प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना या मुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

ही पदे भरणार

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 10949 जागासाठी ही जाहिरात आहे आरोग्य सेवकांचा ‘क’ आणि ‘ड’ वर्गासाठी ही भरती एम पी  एस सी (MPSC), राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या मार्फत केली जाणार आहे. गट ‘क’ संवर्गात परिचारिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक आस्थापनेवरिल पदे या मध्ये लिपिक, टंकलेखक, वाहचालक या सारख्या पदाचा समावेश आहे. तर गट ‘ड’ संवर्गात सफाई कामगार, कक्ष सेवक पदे रिक्त आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये