ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- येथील विदर्भ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात समाज प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्याने महान व्यक्तिमत्त्वांवर आपले विचार मांडले. डॉ. गजानन राऊत यांनी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले. त्यांनी राधाकृष्णन यांचे अद्वितीय तत्त्वज्ञान, अध्यापनाची निष्ठा व राष्ट्रासाठीचे योगदान यांचा विशेष उल्लेख करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तर डॉ. योगेश खेडेकर यांनी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. भारताचा लोह पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पटेलांनी स्वातंत्र्योत्तर भारताचे एकीकरण घडवून आणले, त्यांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि राष्ट्रप्रेम आजच्या पिढीसाठी आदर्श ठरते, असे त्यांनी सांगितले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शाक्य यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही तरुणांना सुसंस्कारी, कार्यक्षम, समाजशील व राष्ट्रभक्ती निर्माण करते असे प्रतिपादन केले.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. परवेज अली आयक्यूएसी प्रमुख उपस्थित होते. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना महापुरुषांचे जीवन मूल्य, त्याग आणि विचार अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन यंगंदलवार राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी यांनी केले. सुत्र संचालन प्रा. गणेश कदम यांनी केले तर आभार डॉ. दिनेश दुर्योधन यांनी मानले कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये