ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वढा येथील शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

चंद्रपूरच्या वतीने वढा येथील रंगमंचावर भव्य सत्कार तथा गुणगौरव सोहळा साजरा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वढा येथील विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती परीक्षा 2023 मध्ये तीन विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविल्याबद्दल रंजन सामाजिक मंच चंद्रपूरच्या वतीने वढा येथील रंगमंचावर भव्य सत्कार तथा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच किशोर वरारकर, सत्कारमूर्ती लोचन वरारकर, मयंक मोहिजे, निशा वरारकर, प्रमुख पाहुणे रंजन सामाजिक मंचाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, शाळा सुधार समिती अध्यक्ष अशोक हागे, मोहन जीवतोडे, वसंत भलमे,बबन धनेवार,कार्तिक वरारकर, एकनाथ मोहिजे, मंगला दुर्वे, माला जेनेकर, कविता गोहकर, सुदर्शन नैताम, प्रवीण मडावी, आदीं उपस्थित होते.

वढा येथिल जिल्हा परिषद शाळेत नैताम व मडावी सर रुजु झाल्यापासून शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यामुळेच शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागल्या, त्यांना अभ्यासाची गोडी लागल्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती तीन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. दोन्ही शिक्षकांच्या अव्याहत प्रामाणिक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना यशाची सवय लागत असुन ह्या माध्यमातून अर्थातच गावाचे नाव जिल्ह्यात प्रख्यात होत आहे अशी भावना त्यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनातुन व्यक्त केली.

डॉ नंदकिशोर मैंदळकर म्हणाले मुलांच्या यशस्वी ते करिता शिक्षक आई-वडील व विद्यार्थी या तिघांनीही मिळून मुलावर लक्ष केंद्रित केले तर मुलाला नक्कीच यश संपादन करता येते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना आवाहन आहे की पुढील वर्षी कमीत कमी दहा विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण व्हायला पाहिजे, याकरिता शिक्षक पालक व विद्यार्थी यांनी कठोर मेहनत घ्यायला हवी व आपल्या वढा या गावाचे नाव उज्वल करण्यास प्रयत्न करायला हवे.

कार्यक्रमाचे संचालन प्रवीण मडावी प्रास्ताविक सुदर्शन नैताम आभार प्रदर्शन मोहन जीवतोडे यांनी केले. विद्या पवार, गणेश मोहिजे, बापूराव गोहोकर,माधुरी वरारकर, साईनाथ येलमुले बाबा चीने,भीमराव भगत यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये