ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा समाजाचा उद्या निषेध मोर्चा !

सकल मराठा समाजकडून निषेध मोर्चाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा समाज बांधव-भगिनींवर अमानुष लाठी हल्ला झाल्यानंतर जिवती तालुक्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ ११ सप्टेंबरला सकाळी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

यानिमित्ताने मराठा समाज पुन्हा एकवटणार आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून जालना येथे मराठा समाज बांधव भगिनींचे उपोषण सुरू आहे. त्या दरम्यान, पोलीस दलाकडून उपोषणकर्त्यांवर अमानुष हल्ला झाला. या घटनेचे जालनामध्ये तीव्र पडसाद उमटले. या लाठी हल्ला पार्श्वभूमीवर जिवती येथे तालुक्यातील सकल मराठा समाजाची बैठक झाली. यामध्ये जालना येथील मराठा उपोषणकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता जाहीर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. हा निषेध मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून निघणारा हा निषेध मोर्चा वीर बाबूराव शेडमाके चौक मार्गे तहसिल कार्यालयापर्यंत जाईल. व तहसीलदार यांना निवेदन देवून मोर्चाची सांगता होईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये