ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छायाचित्रकार संघटनेच्या वतीने निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

चंद्रपूर तथा सावली तालुका छायाचित्रकार संघटना सावली तर्फे माननीय संवर्ग विकास अधिकारी वासनिक साहेब तथा माननीय तहसीलदार परीक्षित पाटील साहेब, सावली यांना तालुक्यात फोटोग्राफी व्यवसायिकांना उद्भवणाऱ्या समस्येबद्दल निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील स्थानिक ग्रामपंचायत व्ही. एल. इ.ऑपरेटर तथा ग्रामसेतू महाआनलाईन ऑपरेटर हे शासकीय यंत्रणा व साहित्याचे अवैध वापर करून घरकुल योजना, शौचालयाचे फोटो तसेच पासपोर्ट साईज फोटो काढण्याचे कामे अवैधरित्या करत आहेत. त्यामुळे सावली तालुक्यातील फोटोग्राफी व्यावसायिकांना उपासमारीची वेळ आलेली आहे.तरी व्ही.एल. ई.ऑपरेटर तथा ग्रामसेतू महाऑनलाईन ऑपरेटर यांच्या शासकीय यंत्रणा ( कंप्यूटर, प्रिंटर, रूम आणि वीजेचा वापर )व साहित्याचे अवैध वापरावर बंदी करण्यात यावी.

तसेच सावली तालुका ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक फोटोग्राफरला प्राधान्य देण्यात यावे.कारण कर्ज उचलून लाखोंचे कॅमेरे घेऊन फोटोग्राफी व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत, त्यामुळे त्यांचे कर्जाचे हप्ते सुद्धा चुकत आहेत, आणि ग्रामपंचायत ऑपरेटर मुळे तालुक्यातील फोटोग्राफी व्यवसायिकांना उपासमारीची वेळ आलेली आहे.

तरी सावली तालुक्यातील फोटोग्राफी व्यवसायिकांचा विचार करून सर्व ग्रामपंचायतींना व्यावसायिक फोटोग्राफर कडून फोटो काढण्याचे आदेश देण्याकरिता छायाचित्रकार संघटना सावलीतर्फे निवेदन सादर करण्यात आले.

    यावेळी जिल्हा छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष नितीन रायपुरे सर,सचिव फुलचंद मेश्राम सर, वासू वाकडे सर, अमोल मेश्राम सर, तथा सावली तालुकाध्यक्ष विनोद बांगरे,सचिव प्रवीण द्विवेदी, उपाध्यक्ष आकाशकांत सहारे, सहसचिव रमेश बावणे, कोषाध्यक्ष राहुल भरडकर, व सावली तालुक्यातील सर्व फोटोग्राफर यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.

यावेळी माननीय संवर्ग विकास अधिकारी वासनिक साहेब तथा मा. तहसीलदार परिक्षित पाटील साहेब यांच्याकडून तात्काळ समस्येचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये